जबरी चोरी व चिकन सेंटर मधील चोराच्या मुस्क्या आवळल्या; सातारा शहर डी.बी.पथकाची कारवाई 


 

स्थैर्य, सातारा, दि. १४: सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने जबरी चोरी आणि चिकन सेंटरमधील रोकड चोरी अशा दोन गुन्ह्यांचा छडा लावला असून दोन्ही संशयितांना जेरबंद केले आहे. जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी विजय उर्फ सावळा बाबा जावळे रा. गणेशनगर, कोर्टी, ता. कराड यास शेंद्रे येथे महामार्गावर पाठलाग करून ताब्यात घेतले तर चिकन सेंटरमधील रोकड चोरून नेल्याप्रकरणी सादिक शहीद सिद्दीकी वय 20 मुळ रा. तुलसीपुर जि. बळरामपुर (उत्तर प्रदेश) यास महाबळेश्‍वर येथून अटक केली आहे. 

याबाबत माहिती अशी, दि. 13 रोजी संबंधित फिर्यादी मनाली हॉटेलसमोरुन भाजी खरेदी करुन जात असताना एका अनोळखी व्यक्तीने मोटर सायकलवरून येवून त्यांच्याशर्टच्या खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन त्यांना हिसडा मारुन चोरून नेला. याबाबत तक्रार नोंद झाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल व पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी सदर ठिकाणची माहिती घेवून आरोपीस ताब्यात घेणेबाबत मार्गदर्शन करुन योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक एन. एस. कदम व डी.बी.पथकाने त्याठिकाणावरुन संशयीत आरोपीची माहिती घेवून व गोपनिय माहिती दारांमार्फत माहिती मिळवली असता सदरचा संशयीत हा उंब्रज परिसरातील असल्याची खात्री झाली. डी.बी.पथकाने मोबाईलची तांत्रिक माहीती घेत संशयीत वर्णनाच्या इसमास शेंद्रे, ता. सातारा येथून हायवे रोडवर पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याचेकडून चोरीस गेला विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटर सायकल हस्तगत केली. पो.उपनिरीक्षक एन. एस. कदम तपास करत आहेत. 

तसेच दि. 11 रोजी सातारा शहरातील नॅशनल चिकन सेंटरमधून कामगाराने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरी करुन चोरुन नेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी दि. 12 रोजी महाबळेश्‍वरमध्ये असल्याची गोपनिय माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाल्याने पो. नि. श्री. आण्णासाहेब मांजरे यांनी डी. बी. पथकास मार्गदर्शन करून त्यांचे पथक महाबळेश्‍वर येथे पाठवून दिले. पो. उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांचे डी. बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे महाबळेश्‍वर येथून संशयीत आरोपी सादिक शहीद सिद्दीकी वय 20 मुळ रा. तुलसीपूर, जि. बळरामपूर (उत्तर प्रदेश) यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील मोबाईल फोन हस्तगत करुन गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतला आहे. तपास पो. ना. दगडे करत आहेत. 

या कार्यवाहीमध्ये पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती दलाल मॅडम, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो. हवा. प्रशांत शेवाळे, पो. ना. दगडे, पो. ना. शिवाजी भिसे, पो. ना. अविनाश चव्हाण, पो. कॉ. संतोष कचरे, पो. कॉ. गणेश घाडगे, पो. कॉ. अभय साबळे व पो. कॉ. गणेश भोंग पो. कॉ. विशाल धुमाळ याींनी सहभाग घेतला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!