
दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । सातारा । निकमवाडी ता. वाई येथे पुष्प उत्पादन तंत्रज्ञान व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक परिसंवाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कृषी विभाग, भा. कृ. अ. प. पुष्प निदेशालय, पुणे, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने फुल शेती करून उत्पादनवाढीवर भर देण्याबाबत सांगितले. तर भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. श्री गणेश कदम यांनी पुष्प उत्पादन बाबत सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉ. डी. एम.फिरके यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान प्रगतशील शेतकरी श्री.धर्मराज देवकर यांच्या फुल शेती क्षेत्रास भेट देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना वाईचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी करुन कृषि विभाग राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमास वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, डॉ. नवीन कुमार, डॉ. तारकनाथ शहा, डॉ. भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणेचे शास्त्रज्ञ संजय कड, विषय विशेषज्ञ भूषण यादगिरवार व श्री.संग्राम पाटील, शहाजी शिंदे ,राजेंद्र डोईफोडे, भाऊसाहेब शेलार व श्री प्रवीण बनकर, माजी पं.स. सदस्य कुमार बाबर, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत जाधव, ए.टी. एम. आत्मा योगेश जायकर, कृषि सहाय्यक विजय वराळे,सुजित जगताप, परशुराम गवळी, विनोद शेळके, सुनिल फरांदे,विक्रम मोहिते, उमेश संकपाळ, संतोष नेवसे, सुनिल चौधरी व निकमवाडी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.