
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । मोळाचा ओढा परिसरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २0 जून रोजी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० जून रोजी साडे सहा वाजण्याच्या पूर्वी शिवराज ज्ञानदेव जगदाळे वय ३०, रा. गंगासागर कॉलनी, आझाद नगर, मोळाचा ओढा, सातारा याने राहत्या घरी फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर डॉ. कोमल पाचागणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.



