
दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । सातारा । आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय सातारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास न्यायालयातील 106 न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, वकील सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी मार्गदर्शन करुन योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिलांना योग प्रशिक्षक ॲङ माधुरी प्रभुणे यांनी तर पुरुषांना योग प्रशिक्षक योगगुरु भास्कर यांनी प्रात्यक्षिके दाखविली. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाऱ्या सचिव तृप्ती जाधव, प्रबंधक वर्षा जोशी व कर्मचारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय, जकातवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास 174 विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे जिल्हा कारागृह सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ॲङ शरद जांभळे यांनी योग दिनाचे महत्व व योग व्यायामाचे महत्व विशद करुन सांगितले. कारागृह अधिक्षक श्री. दुबे यांनी योग प्रात्यक्षिके दाखविली. या कार्यक्रमास कारागृहातील 72 बंदी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.