दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी येथे आज ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जैन सोशल ग्रुप फलटणच्या अध्यक्षा सविता मिलिंद दोशी यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथे नोकरी करणार्या धुळदेवच्या मोनिका जमदाडे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी जमदाडे मॅडम यांनी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खाऊ पाकिटांचे वाटप केले. जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने खाऊ व लेखन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, सेक्रेटरी प्रीतम शहा वडूजकर, खजिनदार समीर शहा, संचालक डॉ. मिलिंद दोशी, राजेश शहा, सचिन शहा, हर्षद गांधी, भारत फोर्जचे महेश शेंडे, धुळदेवचे अर्जुन फरांदे, संस्थेचे अध्यक्ष महादेव नाळे, संचालक संतोष नाळे, उपाध्यक्ष राहुल नाळे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून भाषण करताना सविता दोशी यांनी १५ ऑगस्टनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.