दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । मुंबई । शहरातील मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कानशिलात लगावली. संबंधित अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते, त्या पथकात ते अभियंताही सहभागी होती. त्यामुळे, संतापलेल्या आमदार जैन यांनी अभियंत्याचा कानउघडणी करत कानशिलात लगावली.
आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली.
यावेळी, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत असे आहेत शासन आदेश आहेत, असेही त्यांनी सांगितले.