भांडणे सोडवण्यास गेलेल्यास दांडक्याने मारहाणतिघांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि.१७: येथील भावे बडिशेप कारखान्यासमोर भांडणे सोडवायला गेलेल्या एकास दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रविण भालचंद्र मोरे, तुषार कदम, केदार कदम सर्व रा. भावे बडिशेप कारखान्याजवळ, सातारा अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती येथील भावे बडिशेप कारखान्याजवळील बोळात प्रविण मोरे आणि दीपक कदम, विशाल कदम यांच्यात भांडणे सुरू होती. ती सोडवण्यासाठी अमित अरुण देशपांडे हे गेले. मात्र, त्याचा राग येवून आणि पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून प्रवीण मोरेे याने दांडक्याने देशपांडे यांच्या पाठीवर, मानेवर आणि डाव्या हाताच्या कोपरावर मारले. उजवा हात पिरगाळून डबल बार वर आपटला. यात देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यावेळी तुषार कदम आणि केदार कदम यांनी देशपांडे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तिघा संशयीतांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास मपोना शेख करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!