एसटीच्या एनसीएमसी कार्ड यंत्रणेचा बोजवारा; ज्येष्ठ नागरिक व महिलांना भुर्दंड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

एसटी प्रवासात डिजिटल व्यवस्थेसाठी लागू केलेल्या एनसीएमसी कार्ड प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचा लाभ मिळेनासा झाला असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना पूर्ण तिकीटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात डिजिटल तिकीट व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र, या यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सवलती मिळण्यात तांत्रिक अडथळे

महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासादरम्यान कार्ड असूनही सवलत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना नाहक पूर्ण भाडे देऊन तिकीट काढावे लागत आहे.

प्रणालीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

अमृत ज्येष्ठ नागरिक, इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य धरून ती ईटीएम मशीनवर स्कॅन करण्याचे नियम आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये या नियमांची योग्य पूर्तता होत नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तांत्रिक त्रुटी दूर करून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!