
थेट WhatsApp वर मिळवा
महसूल विभागातील कामांसाठी कार्यालयीन वेळेत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. यात सुधारणा करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार आता नागरिकांना दुपारी ३ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांची भेट घेता येणार आहे.
भेटेची वेळ आणि पारदर्शकता
सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि कामांची तातडीने दखल घेतली जावी, यासाठी ही विशेष वेळ निश्चित करण्यात आली आहे. या ठरलेल्या वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहून नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रशासकीय कामांमध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना या वेळेनुसारच कार्यालयात पोहोचण्याचे आवाहन केले आहे.





