शेंदुरजणे येथे चार जणांविरोधात गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोरेगाव, दि. ५ : मुंबई येथून विनापरवाना शेंदुरजणे, ता. कोरेगाव येथे येणार्‍या युवकासह त्याची माहिती न देणारे मामा आणि गावातील दोघांविरोधात मास्क न परिधान करता फिरण्याबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बंदी असताना देखील दीपक अशोक जाधव हा युवक दि. २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई सेंट्रल येथून शेंदुरजणे या गावी आला. तो त्याचे मामा मुरलीधर व्यंकट येवले यांच्या घरी सहा दिवस राहिला. त्याबाबतची माहिती त्याने अथवा त्याचा मामा येवले यांनी ग्रामकृती समितीस देणे बंधनकारक असताना देखील दिली नाही, म्हणून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अनिकेत आनंदराव येवले आणि बबन वामन येवले हे तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलीस पाटील अशोक बोडके यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मिलिंद कुंभार तपास करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!