फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेतील उपविजेत्या श्रीमती मान्या सिंह यांचा परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांच्या हस्ते सत्कार


स्थैर्य, मुंबई, दि.१८: व्ही एल सी सी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती झाल्याबद्दल परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांचा मंत्रालयीन दालनात सत्कार केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रिक्षाचालकाच्या मुलीने यश मिळविले हे कौतुकास्पद असून ॲड.परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुलांचा शिक्षणाचा खर्च रिक्षा युनियन उचलते. युनियनद्वारे आतापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या मुलांचा खर्च उचलला. व्ही एल सी सी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या मान्या सिंह हिला युनियनद्वारे आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आयुष्यात मेहनतीनेच फळ मिळते, असे सांगून ॲड. परब यांनी केलेल्या सन्मानाबाबत श्रीमती मान्या सिंग व तिचे पिता यांनी परिवहनमंत्र्यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!