फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती; खडसेंचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचे सांगितले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावले होते. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असे मी त्यांना सांगितले. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचे फडणवीसांनी म्हटले होते, असे खडसे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला.

राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचे सांगितले. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचेच नाव पाठवणार आहोत आणि तुमचे नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. पण नंतर चार दुसरीच नावे आली, असेही त्यांनी सांगितले.

माझ्याकडे काही पुरावे आणि फोटोग्राफ्स आहेत. ही माहिती उघड केली तर धक्का जरूर बसेल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे खडसेंकडे कोणते पुरावे आहेत? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!