“बाबरी पडली तेव्हाही उद्धव ठाकरे मातोश्रीत होते आणि आजही मातोश्रीतच आहेत”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । मुंबई । बाबरी ढाचा पाडला तेव्हा कोण होतं हे विचारायचं झालं तर उद्धव ठाकरे कुठे होते? राम मंदिराच्या संघर्षाच्या काळात त्यांची भूमिका काय होती? स्वत: नामनिराळे राहायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे. हे हवेचे बुडबुडे काढण्याचे प्रयोग, धंदे बंद करा. ज्यावेळी राम मंदिराचे आंदोलन, संघर्ष सुरू होता तेव्हाही तुम्ही मातोश्रीत होता आणि आजही मातोश्रीतून प्रश्न विचारत आहात अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यापक भूमिका त्यावेळच्या कारसेवकांसाठी घेतली हे खरे आहे. बाळासाहेबांनी रामजन्मभूमी अभियनात सकारात्मक भूमिका घेतली. या सगळ्यांचा अभियनात नक्की उपयोग झाला. हिंदू साधुसंत, विविध संघटना यांनी चालवलेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मोठी होती. पण त्यांच्या जीवावर आज उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारावा त्याआधी तुम्ही कुठे होता याचे उत्तर द्या असं शेलारांनी सांगितले.

तसेच वायनाडमध्ये राहुल गांधींनी पुन्हा मी गांधी, सावरकर नव्हे असे पोस्टर्स लावलेत. मग तुम्ही गांधीधारी ती सावरकर धारी याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. गांधीधारी असाल तर बाळासाहेबांचे विचार सोडून आज कुणाला चाटत बसला याचेही उत्तर द्यावे लागेल. चंद्रकांत पाटलांनी हे विधान केले नसते तर बरे झाले आहे. सकल हिंदू समाज एकत्र आला पाहिजे अशी भूमिका त्याकाळी होती. चंद्रकांत पाटील यांचे जे विधान केले ते त्यांची व्यक्तिगत मत आहे. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वेगळी होती. आजही हिंदू जनआक्रोश लव्हजिहादविरोधात करतात तेव्हा त्यावर उद्धव ठाकरे टीका करतात. हिंदू एकत्र आला तर तुमच्या पोटात का दुखते? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ पाहा. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली.


Back to top button
Don`t copy text!