वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढविण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज; आजपासून प्रचारास सुरूवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
खटाव तालुक्यातील वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फुले लिखित ‘शेतकर्‍यांचा आसूड’ ओढला आहे. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते निवडणूक लढविण्यास सिद्ध झाले आहेत.

यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, दत्तू घार्गे, तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे यांच्यासह बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार आणि गावच्या शाखेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि कटगुण ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने हनुमंतराव गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा स्वागत सत्कार केला.

या बाजार समितीमध्ये वाईट चालीरीती आणि प्रथा बंद करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते निवडून देण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, सूर्यभान जाधव यांनी केले.

यावेळी संघटनेचे उमेदवार सुदाम लावंड, युवराज पवार, संतोष तुपे, सत्यवान गलांडे, काकासाहेब सजगणे, सुभाष जाधव, बापूसोा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. इतर पक्षांच्या आघाड्या आणि युतीची चर्चा असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.

दरम्यान, वडूज शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यास बरे वाटेल, असे कोरेगाव – खटावचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!