दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
अभ्यासाबरोबर मैदानातील खेळाचा सराव होऊन विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करावी व त्याचबरोबर क्रीडा शिक्षक यांनासुद्धा न्याय मिळावा, या उद्देशाने बारामती तालुक्यात इंग्लिश मीडियम स्टूडेंट स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष आशिष डोईफोडे, उपाध्यक्ष श्रीराम इंगोले, सचिव संतोष कसबे, कार्याध्यक्ष गणेश काकडे आदी पदाधिकारी यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय क्रीडा क्षेत्रासाठी कमी वेळ भेटतो, त्यामुळे इच्छा असूनही आवडत्या खेळामध्ये यश मिळवता येत नाही. त्यासाठी क्रीडा विभागात विकास करणे, विविध उपक्रम राबिवणे, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, त्यानंतर यशस्वी खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती योजना सुरू करणे, इंग्रजी माध्यम शाळामध्ये क्रीड़ा प्रशिक्षक व शिक्षक नेमावा यासाठी प्रयत्न करणे व रोजगार निर्मिती क्रीडा शिक्षकांना करून देणे, क्रीडा विषयक निबंध, चित्रकला स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा भरविणे, ज्यामुळे मुलांना जागतिक स्तरावरील क्रीडा घडामोडी कळाव्यात, शासन दरबारी क्रीडा विषयक प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे, संघटना मजबूत करणेसाठी तालुका, जिल्हास्तरावर पदाधिकारी नेमणे आणि इतर राज्याप्रमाणेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी व क्रीडा शिक्षक यांना खेळासाठी न्याय मिळावा व राज्यातील एक तरी खेळाडू कोणत्याही खेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये जावा यासाठी शोध घेऊन त्यास सर्वतोपरी मदत करणे हे अंतिम ध्येय इंग्लिश मीडियम स्टूडेंट स्पोर्ट्स असोसिएशनचे असल्याचे अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी सांगितले.