फलटण ते कन्याकुमारी १९०० कि.मी. सायकल राईडला सुरूवात


दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण सायकल असोसिएशनच्या माध्यमातून फलटण ते कन्याकुमारी या १९०० किलोमीटरच्या सायकल राईडचा आज सकाळी ठीक ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शुभारंभ झाला.

डॉ. खंडेलवाल, श्री. मिसाळ, श्री. रामकाका मुळीक व श्री. प्रमोद निंबाळकर यांनी ही राईड यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या राईडमध्ये सहभागी सदस्य श्री. सागर गायकवाड सर, श्री. युगांत शिंदे, श्री. आनंदराव काळूखे, श्री. स्वप्नील खराडे, श्री. सारंग काळूखे यांचे हार्दिक अभिनंदन व राईड यशस्वी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा फलटणकरांनी दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!