स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रानभाज्या खा… अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
रानभाज्या खा… अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा
ADVERTISEMENT


 

मान्यवरांचे आवाहन; रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थैर्य, सोलापूर, दि. 9 : माहिती असलेल्या पालेभाज्या फळभाज्या आपण खातो पण बांबूच्या कोवळ्या पानांची सराटा केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर करण्याचे आवाहन रानभाजी महोत्सवात मान्यवरांनी केले.

निमित्त होते नेहरूनगर शासकीय मैदानात राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मातर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अमृत सागर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार आजच्या ऑगस्ट क्रांती आणि जागतिक आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात रानभाज्यांचे महत्व पटवून दिले. महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये सोलापूर शहरात नागरिकांना भाजीपाला कमी पडू दिला नाही. रानभाजीला आयुर्वेदिक महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख यांनी रानभाज्या महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. हा स्तुत्य उपक्रम असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. रानभाज्यासाठी सोलापूर ब्रँड व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शंभरकर म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून भाज्या खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दिवाणजी म्हणाले, फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी रानभाज्या खाणे महत्वाचे आहे.

यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. तसेच रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाला अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शिवकुमार सदाफुले, शहाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

या महोत्सवात चुका भाजी, अंबाडी, गुळवेल, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, इचका, टाकळा, चंदन बटवा, करडई आणि कुरडू या रानभाज्या विक्रीसाठी आहेत. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले उपयोग याची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

11 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित

Next Post

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Next Post
धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

पवारांचे केंद्रावर टीकास्त्र:’अजूनही वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा

January 26, 2021
पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

January 26, 2021
तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

January 26, 2021
लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

January 26, 2021
‘हमाम मे सब नंगे है’ याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे; संजय राऊत यांचा भाजपला टोला

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

January 26, 2021
शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

January 26, 2021
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

January 26, 2021
जलसिंचन चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव

जलसिंचन चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव

January 26, 2021
आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.