गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तत्परतेमुळे भायखळ्यातील सहा रहिवाशांना मिळाली हक्काची सदनिका


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । मुंबई । मुंबईतील भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी या म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुनर्विकास योजनेत 6 रहिवाशांना हक्काची सदनिका मिळाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली व रहिवाशांनी यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर मंत्री श्री. आव्हाड यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती व त्यांनी दिलेल्या निर्देशानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली आणि 6 रहिवाशांना अखेर न्याय मिळाला.

बारा वर्षांपासून सदनिकेपासून वंचित असलेले गणेश बाळ सराफ, नंदकिशोर जाधव, महेंद्र शाह, रमेश गायकवाड, प्रकाश बोऱ्हाडे, प्रभाकर घारमळकर या रहिवाशांना नुकतीच हक्काची सदनिका विकासक क्षितिजा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोसायटीतर्फे ताब्यात देण्यात आल्या आहेत. भायखळा पश्चिम, ना.म.जोशी मार्ग, भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी येथे सदनिका मिळाल्याबद्दल या रहिवाशांनी मंत्री श्री.आव्हाड यांची भेट घेऊन आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!