औषधांच्या दुकानांमध्ये संध्याकाळी 8 वाजल्यानंतर खाद्य पदार्थ विकण्यास मनाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०४: जिल्ह्यात औषधांच्या दुकानांमध्ये संध्याकाळी 8 वाजल्यानंतर आईस्क्रीम, चॉकलेट, स्नॅक्स, इ. खाद्य पदार्थ विक्री करत असल्याचे निर्दशनास आल्याने अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मेडिकल-औषधांचया दुकानांमध्ये संध्याकाळी 8 वा. नंतर अत्यावश्यक सेवा वगळता आईस्क्रीम, चॉकलेट, स्नॅक्स, इ. खाद्य पदार्थ विक्री करण्यास मनाई केली आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय -कायदेशीरर कारवाई करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!