
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या काळात कोणताही गाजावाजा न करता गोरगरिबांना आधार देण्याचे काम करणारे येथील डॉ सुभाष गुळवे यांनी काम केले आहे. याच कार्याची दखल घेत डॉ. गुळवे यांना मुंबई येथील सत्यमेव जयते ट्रस्ट तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्याबरोबरच आपला दवाखाना दिवसभर सर्वांसाठी मोफत डॉ. सुभाष गुळवे यांनी सुरु ठेवला होता. कोरोना रोग प्रतिबंधक ठरणार्या औषधाचेही त्यांनी मोफत वाटप केले. तसेच गरजूंना अन्नधान्याचे किटचेही वाटप कोणताही गाजावाजा न करता केले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष संजय पवार यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले आहे.
