
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। फलटण । येथील माती व पाणी परीक्षण तज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांना महात्मा फुले विचार अभियानाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार 2025 चा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उपळेकर मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास लेखक व साहित्यक सर्जाकार सुरेश शिंदे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव, पुण्यश्लोक अहल्यादेवी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.