हरिष पाटणे यांच्या कारकिर्दीत ग्रामीण पत्रकारांना न्याय : सुभाष भांबुरे


दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। सातारा । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या अधिस्वीकृती पत्रिका ह्या जास्तीत जास्त हरिष पाटणे यांच्या कार्यकाळात पुणे विभागात मंजूर होत आहेत. हरिष पाटणे यांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळत असून यापूर्वी जे घडत नव्हते ते आता घडू लागले असल्याचे मत फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी व्यक्त केले.

फलटण येथील जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांच्या अधिस्वीकृती पत्रिकेचे वितरण पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भांबुरे बोलत होते. यावेळी सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रूद्रभटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भांबुरे म्हणाले की, आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याने अधिस्वीकृती समितीचे विविध सदस्य व अध्यक्ष बघितलेले आहेत परंतु हरीश पाटणे यांच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारांना ज्या प्रमाणामध्ये न्याय मिळत आहे त्या प्रमाणात यापूर्वी कधीही मिळत नव्हता. संघटनेमध्ये काम करत असताना एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये पत्रकार हे आपला वेळ वाया घालवत होते.

यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये पत्रकारांच्या मध्ये नकारात्मक दृष्टीने काम करण्याची पद्धत होती परंतु सातारा जिल्ह्याचे पत्रकारांचे नेतृत्व हे हरिष पाटणे यांच्याकडे आल्यापासून व त्यानंतर पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद हरिष पाटणे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी यामध्ये मोठा बदल घडवून आलेला आहे व तो बदल आता सर्वसामान्य पत्रकारांना सुद्धा जाणवत असल्याचे मत भांबुरे यांनी व्यक्त केले.

यावेळी सुभाष भांबुरे यांनी अध्यक्ष हरिष पाटणे, समितीचे सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, अमन सय्यद, सुनीत भावे, जिल्हा माहिती अधिकारी सौ. वर्षा पाटोळे यांचे आभार मानले.

गळ्यात कार्ड पडतात भांबुरे भाऊक

फलटण येथील पत्रकार सुभाष भांबुरे हे गत 30 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. 30 वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत असून सुद्धा त्यांना अद्याप अधिस्वीकृती पत्रिका मिळाली नव्हती. परंतु हरिष पाटणे यांनी सदरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यानंतर गळ्यात कार्ड पडताच भांबुरे भाऊक झालेले उपस्थितांना पाहायला मिळाले.

फलटण येथील जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांच्यासारख्या पत्रकारांना न्याय देता आला; याचा आम्हाला मनस्वी समाधान आहे.

  • हरिष पाटणे,

  • अध्यक्ष पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती


Back to top button
Don`t copy text!