
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । फलटण । संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2022 यांच्यामार्फत “घरोघरी संविधान” हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. “घरोघरी संविधान” हा उपक्रम कौतुकास पात्र असून आगामी काळामध्ये जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जावेत, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
फलटण येथे “घरोघरी संविधान” या उपक्रमाचा शुभारंभा प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. यावेळी तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड तसेच मंगळवार पेठेतील सर्व जेष्ठ मान्यवर, युवा मित्र परिवार व जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे, दत्ता अहिवळे, जे.एस.काकडे, विजय येवले, बाळासाहेब अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, सनी काकडे, ॲड. रोहित अहिवळे, सागर सोरटे, हर्षल लोंढे यांच्यासह जंयती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2022 फलटण यांच्या मार्फत “घरो घरी संविधान” असा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असुन असेच समाजोपयोगी उपक्रम आगामी काळात सुध्दा राबविण्यात यावेत, असे मत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी शाम अहिवळे, सुशांत अहिवळे, कुणाल काकडे, प्रतीक गायकवाड, गौतम अहिवळे, सुशांत काकडे, केतन सोरटे, विकी काकडे, निखिल अहिवळे, अंश काकडे, हर्षवर्धन अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.