दैनिक स्थैर्य | दि. 30 नोव्हेंबर 2023 | फलटण | फलटण शहरात महात्मा फुले चौक ते नाना पाटील चौक येथे नगरपरिषदेच्या वतीने डिव्हायडरचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या मार्गावर असणारे जुने डिव्हायडर जमीनदोस्त केले आहेत. जिथे रस्ते अरुंद आहेत त्या ठिकाणी सिंगल तर जिथे रस्ते आहेत तिथे मोठे डिव्हायडर बसवण्यात येणार आहेत.
फलटण शहरामध्ये अनेक विकासकामे ही विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली आहेत. अनेक विकासकामांना राज्य व केंद्र सरकारचा निधी प्राप्त आहे. सुमारे 3 वर्षे प्रशासक राज असल्याने विकासकामे ठप्प आहेत. तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी तातडीने मंजूर विकासकामे मार्गी लावावीत; अशी मागणी जोर धरू लागली आहे.