दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । फलटण । मौजे सासकल येथे कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि जोशी हॉस्पिटल प्रा ली , फलटण च्या संयुक्त विद्यमाने डॉ प्रसाद जोशी यांच्या हस्ते नारळ आणि केशर आंबा यांची 100 कलमे व रोपे सासकल ता. फलटण जि. सातारा येथील शेतकऱ्यांना भेट देण्यात आली.
यावेळी अशोक नाळे मंडळ कृषि अधिकारी बरड यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेबाबत सविस्तरपणे माहिती दिली. BSF company चे Assistant Manager सुदर्शन कदम यांनी फवारणी कशी करावी आणि किटकनाश फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर व कोणती काळजी घ्यावी याचे उत्तम मार्गदर्शन केले.
योद्धा academy चे सर्वेसर्वा रणजित तांबे यांनी महाराष्ट्र राज्यसेवा आयोगbआणि केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांसाठी मुलांनी काय केले पाहिजे त्याबद्दल माहिती दिली. यावेळी डॉ प्रसाद जोशी यांनी आरोग्य उत्तम कसे ठेवावे आणि आपणच आजाराला कसे निमंत्रण देत असतो याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच योगासन व नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य उत्तम रहाण्यास मदत होणार असल्याचे डॉ.प्रसाद जोशी यांनी सांगितले. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी देशी झाडे का लावावीत याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.आणि वसुंधरे चे संवर्धन बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री.योगेश भोंगळे यांनी शेतकरी अपघात विमा योजना बद्दल माहिती दिली.तसेच श्री.ज्ञानेश्वर शिंदे फळपीक विमा प्रतिनिधी यांनी फळपीक विमा योजने बाबत माहिती दिली. फलटण चे तहसीलदार समीर यादव साहेब यांनी कलमे व रोपे वाटप कार्यक्रम स्तुत्य असल्याचे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडाची लागवड करणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.तसेच ई पीक पाणी शेतकऱ्यांनी करणे बाबत अवाहन केले.
यावेळी समीर यादव तहसीलदार फलटण, मुख्याधिकारी फलटण नगर परिषद फलटण संजय गायकवाड , डॉ प्रसाद जोशी यांच्या हस्ते पोपट घोरपडे, नामदेव मुळीक भगवान मुळीक , कुमार मुळीक व गावातील १०० शेतकऱ्यांना आंबा व नारळ आणि safety kits चे वाटप केले. तसेच बाळासो शिर्के यांच्या शेतावर नारळ लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक सासकल यांनी केले.कार्यक्रमाची सांगता विठ्ठल नामाच्या गजराने झाली. सामाजिक बांधिलकी जपणारा,संत तुकारामाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंग रचनेप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचा आणि मनाला एक वेगळाच आनंद देणारा उपक्रम आज आषाढी एकादशी निमित्ताने सासकल येथे संपन्न झाला.