
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : राज्यात दि.1 ते 7 जुलै दरम्यान संपन्न झालेल्या वन महोत्सवानिमित्त फलटण शहरातील शुक्रवार पेठ येथील युवक गणेशोत्सव मंडळाने वड, शिसु, करंज, चिंच, वर्षांवृक्ष (रेन ट्री), कडुलिंब, कांचन, आवळा, पेरू (लाल) इत्यादी झाडांच्या सुमारे 150 हून अधिक रोपांचे मोफत वाटप करुन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात योगदान दिले.
सध्या वाढत्या वसाहती/औद्योगिकीकरणामुळे व लोकसंख्येमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून युवक गणेशोत्सव मंडळातर्फे हा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला होता. सदर रोपांची किमान 2ते 3 वर्षे काळजी घेण्याच्या अटीवर ही रोपे देण्यात नागरिकांना देण्यात आली असून इथून पुढील काळातही पर्यावरण रक्षणाच्या कार्यात योगदान सुरु राहणार असल्याचे असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
