पालखी सोहळ्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस सज्ज; ३०० पोलीस मित्र तैनात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात. पोलिसांच्या मदतीसाठी ३०० पोलीस मित्र सज्ज.

स्थैर्य, फलटण, दि. १३ जुलै : सातारा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. पालखी मार्गावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला ६५ पोलीस पाटील आणि विविध अकॅडमींमधील ३०० पोलीस मित्र तैनात करण्यात येणार आहेत.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

पालखी सोहळा १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून, १७ जुलै रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी बरड येथून पालखी पुढे मार्गस्थ होईल. या काळात वाहतूक नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात १५० अधिकारी, एक हजार पोलीस अंमलदार आणि एक हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

पोलीस मित्रांचा महत्त्वपूर्ण सहभाग

गर्दी नियंत्रणासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना स्थानिक पातळीवर मोठी मदत मिळणार आहे. स्वरूपा करिअर अकॅडमी (फलटण), ध्येय करिअर अकॅडमी (सोमंथळी) आणि कोलवडीकर अकॅडमी (वडले) येथील सुमारे ३०० स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून काम पाहतील. यासोबतच परिसरातील ६५ पोलीस पाटील देखील या बंदोबस्तात प्रशासनाला मदत करणार आहेत.

पोलीस निरीक्षकांचे मार्गदर्शन

पोलीस मित्र म्हणून मदत करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान स्वयंसेवकांनी आपली भूमिका कशी पार पाडावी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!