स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेपत्ता मंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला येणार; महंतांच्या बैठकीत घोषणा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 20, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य,मुंबई, दि.२०: मुळची परळी येथील परंतू इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात असलेल्या टिकटॉकस्टार पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यावरून राज्यात मोठे वातावरण तापले आहे. यामध्ये शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. यामुळे राठोड गेल्या 10-12 दिवसांपासून नॉट रिचेबल असून सरकारमधील काही लोकांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई, तपास सुरु आहे. अशातच राठोड केव्हा बाहेर येणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे सांगितले होते. मात्र, राठोड काही आले नाहीत. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच- सहा दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज वाशिमच्या पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. असलेले वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली. यामुळे अखेर राठोड लोकांसमोर येणार आहेत. परंतू ते पूजा चव्हाण प्रकरणी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.


ADVERTISEMENT
Previous Post

सुधारणावादी पत्रकारितेचा पाया बाळशास्त्रींनी रचला: सुभाषराव शिंदे; फलटण येथे जयंतीनिमित्त ”दर्पण”कारांना अभिवादन

Next Post

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार, संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा; काँग्रेसचे नावच घेतले नाही!

Next Post

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार, संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा; काँग्रेसचे नावच घेतले नाही!

ताज्या बातम्या

प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन

February 24, 2021

1 मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; फक्त ‘या’ लोकांना मिळणार मोफत लस

February 24, 2021

‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

February 24, 2021

‘हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते’, जितेंद्र आव्हाडांकडून नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

February 24, 2021

…. तर संबंधित व्यवस्थापनावर रूपये एक लाख दंड व फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी शेखर सिंह

February 24, 2021

वडूजचा आठवडी बाजार बंद; मुख्याधिकार्यांचा निर्णय

February 24, 2021

शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

February 24, 2021

पोलिसांची मोठी कारवाई; भाजपा नेता राकेश सिंहला ड्रग्सप्रकरणी अटक

February 24, 2021

फॉरेनर्सचा सातारा जिल्हा कारागृहात धुमाकूळ; सीसीटीव्हीची तोडफोड करत विवस्त्र होवून केले असभ्य वर्तन

February 24, 2021

व्यापारयांचा शुक्रवारी जीएसटी विरोधात सातारा जिल्ह्यात बंद

February 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.