दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुयातील ‘श्रीराम जवाहर’ सहकारी साखर कारखान्याने उसाचा दुसरा हप्ता व नवीन दराची घोषणा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.
गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा मी ऊस उत्पादक सभासद आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याबरोबर उसाचा दुसरा हप्ता त्वरित मिळाला पाहिजे व नवीन उसाचा दर जाहीर करावा यासाठी मी श्रीराम जवाहर कारखान्याच्या गेटसमोर दि. २४ ऑटोबर २०२३ रोजी विजयादशमी (दसरा) ला सकाळी ११.०० वाजता लाक्षणिक उपोषणाला तालुयातील सर्व ऊस उत्पादक सभासदांसह बसणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी श्रीराम जवाहर व प्रशासनाने घेऊन शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी माझी आपणाकडे मागणी आहे.
या निवेदनाच्या प्रती फलटण तहसीलदार, श्रीराम जवाहर कारखान्याचे प्रोजेट मॅनेजर, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.