दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महिलांसाठी आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती मिळाली, रक्तदान शिबिरात महिलांनी पुढे होऊन केलेले रक्तदान प्रत्येक घटकासाठी महत्त्वपूर्ण, आदर्श व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन बारामती हाय टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सुनेत्रा पवार मार्गदर्शन करत होत्या. याप्रसंगी बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँक चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर, मा. नगरध्यक्षा भारती मुथा, मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, अभिजित जाधव, मा. नगरसेवक सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण, किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे, सीमा चव्हाण, अंजली संगई, शुभम ठोंबरे, ऋषी देवकाते, गणेश शिंदे, तुषार लोखंडे, डॉ. सौरभ मुथा, अॅड. अमर महाडिक, नितीन लोखंडे आणि जांब ग्रामपंचायतीचे सरपंच समाधान गायकवाड, सपकाळवाडीचे सरपंच तानाजी सोनवणे, मातंग एकता आंदोलनचे विनोद लोखंडे, आरपीआयचे सुनील शिंदे आदी मान्यवर, पत्रकार, रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामतीमध्ये रक्तदान ही चळवळ होत असताना माझ्या वाढदिवसानिमित्त शिबिर आहे म्हणून अनेक महिला पुरूषांच्या बरोबरीने पुढे होऊन आवर्जून रक्तदान करतात, ही सामाजिक बदल दर्शवणारी गोष्ट असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी म्हटले.
अपघात, ऑपरेशन व इतरवेळी तातडीची रक्त ही गरज असल्याने व सामाजिक भान जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून ७२७ बाटल्यांचे रक्तदान केल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले. वासुदेव, ढोलकी वादक, पोतराज आदी कलाकार मंडळींनीसुद्धा आवर्जून रक्तदान केले.