दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते नाना पाटील चौकापर्यंत एक मनोरुग्ण महिला रस्त्यावर अचानक पळणे, वाहनांना आडवं पडणे, रस्त्यावर लोळणे, महिला-मुलींच्या अंगावर अचानकपणे धावून जाणे, रस्त्यावर दगड-विटा टाकणे असे प्रकार करत आहे.
या महिलेच्या रस्त्यावर आडवेतिडवे पळण्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. ही महिला रस्त्यावर चालताना व्यवस्थित चालते व अचानकपणे वाकडंतिकडे पळत सुटते, त्यामुळे समोरून किंवा मागून येणारा वाहनधारक गडबडून जात आहे. तिच्या अशा पळण्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या मनोरुग्ण महिलेची व्यवस्था करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.