सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतली अभिनेत्री सायरा बानो यांची सांत्वनपर भेट


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । मुंबई । सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनेत्री सायरा बानो यांची आज त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्री श्री.देशमुख यांनी दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री श्री. देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख उपस्थित होत्या.

एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांचा अभिनय सदैव स्मरणात राहील, अशा भावना मंत्री श्री.देशमुख यांनी भेटीदरम्यान व्यक्त केल्या.


Back to top button
Don`t copy text!