
दैनिक स्थैर्य । दि.२७ मार्च २०२२ । सातारा । जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन सातारा शहरात गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला. ही घटना कमानी हौद ते पोवईनाका सातारा या दरम्यान घडली. या घटनेनंतर वाढदिवस साजरा करणाऱ्या आठजणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल खाडे यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यामध्ये साद युनुस शेख वय १९, रा. गुरुवार पेठ, सातारा, प्रथमेश किरण भागवत वय ३१, रा. विकासनगर खेड, सातार या दोघांसह अनोळखी ६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कमानी हौद ते पोवई नाका या रस्त्यावर हा प्रकार घडला. वाढदिवस साजरा करण्यासाठी बेकायदशिररित्या जमाव जमविण्यात आला असून त्यावेळी विनामास्क गर्दी जमली होती. यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.