जिल्हयात भाजप नंबर एकचा पक्ष बनविणार; दोन्ही राजे सोबत घेऊन पक्षसंघटन वाढविण्याची आ. जयकुमार गोरे यांची ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२७ मार्च २०२२ । सातारा । भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत आहे. तुम्ही मला साथ द्या मी जिल्हयात भाजप नंबर वन चा पक्ष बनवून दाखवतो. खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय ठेऊन पक्ष संघटना निश्चितच पुढे नेऊ आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकत दाखवून देऊ अशी स्पष्ट ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरे व प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोरे बोलत होते. पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भरत पाटील, दत्ता थोरात, सुवर्णा पाटील, सुरभी भोसले, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, अविनाश फरांदे आदी उपस्थित होते.

आ. गोरे पुढे म्हणाले, भाजप पक्षाने माझ्या सारख्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यावर पक्ष संघटन व विस्ताराची मोठी जवाबदारी दिली आहे. विक्रम पावसकर यांनी गेल्या सहा वर्षात भाजप जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविला. पक्षात गटातटाचे नाही तर संघटनात्मक काम करून जुन्या जाणत्या सदस्यांचा सन्मानं होईल. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे. पण ते दोघेही भाजपचे असून त्यांच्या समन्वयाने पक्ष मजबूतीकरणाचे काम होईल. साताऱ्यात स्वतंत्र पक्ष कार्यालयासाठी पाठपुरावा करू आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद या निवडणुकीत भाजप जिल्हयाचा नंबर एक चा पक्ष होईल याची घोषणा गोरे यांनी केली.

खा. निंबाळकर म्हणाले,” येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. विक्रम पावसकरांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात भाजप चागल्या प्रकारे तळागाळात वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात निवडणुका केवळ लढवायच्या नसून जिंकायच्या आहेत.

पावसकर म्हणाले, भारतीय जनता पक्षात एखादे नेतृत्व पुढे येत असल्यास त्याला संधी दिली जाते. सातारा जिल्ह्याला आमदार असणारे पहिल्यादा जिल्हाध्यक्ष लाभले आहेत. येणाऱ्या काळात आपण सर्व जण ताकतीने काम करणार आहोत. याचबरोबर, पुढील विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सर्व आमदार भाजपचे निवडुन आणायचा संकल्प करायचा आहे.’’
भाजपचा झेंडा आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांनंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात निश्चितच फडकेल त्याकरिता आमदार जयकुमार गोरे यांना मी त्यांना शुभेच्छा देतो असे आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जयकुमार गोरे हे धडाकेबाज नेतृत्व आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मागे हटण्याची गरज नाही, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. सदाशिव खाडे म्हणाले,” जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळणार आहे. तसेच येत्या काळात प्रत्येक नगरपालिका, झेडपी व इतर सर्व निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे.’’

७५ टक्के कॉग्रेस भाजपवासी करणार

भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांवर असल्याचे सांगत येत्या काही दिवसात ७५ टक्के कॉग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!