हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय शरद जाधव वय 27, राहणार खडक पेठ, मसूर, तालुका कराड आणि नितीन चंद्रकांत जाधव वय 27, राहणार संतोष नगर, मसूर, तालुका कराड या दोघांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, कडेगाव या तालुक्यातून एक वर्षांकरिता हद्दपार केले असताना आदेशाचा भंग करून हे दोघे माजगाव तालुका पाटण गावच्या हद्दीत वावरताना सापडले आहेत. याबाबत मयूर महादेव देशमुख वय 31 यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार सुर्वे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!