रामविलास पासवान यांच्या मृत्यूचं षडयंत्र?; मुलगा चिरागवर संशय, न्यायालयीन चौकशीची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, पटणा, दि.२: माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या ऌअट पक्षाने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ऌअट चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे. संपूर्ण देशाला माहिती झालं पाहिजे की, चिराग पासवान हे रामविलास पासवान यांच्याशी निगडीत कोणते रहस्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्वांना माहिती झाले पाहिजे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूशी निगडीत अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे चिराग पासवान यांच्याभोवती संशय निर्माण होत असल्याचा दावा रिजवान यांनी केला आहे.

हिंदुस्तान अवाम मोर्चाचे डॉ. दानिश रिजवान यांच्या नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सहकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला, शोककळा पसरली, आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरुन जाते. परंतु दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे रामविलासजींच्या अंत्यसंस्काराच्या दुस-याच दिवशी व्हिडीओ शूटींग करताना दिसतात. या व्हिडीओत ते हसताना, वारंवार रिटेक घेताना दिसत होते त्यामुळे त्यांच्या या वागणुकीवर प्रश्न निर्माण होत आहेत.

रामविलास पासवान यांच्या निधनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, ज्यामुळे चिराग पासवान यांच्याबद्दल संशय निर्माण होतो, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा कोणाच्या सांगण्यावरुन हॉस्पिटल प्रशासनाला मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यापासून रोखलं गेलं? रामविलास पासवान यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी फक्त ३ लोकांना परवानगी होते, त्यांना भेटूही दिलं नाही असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर यावं अशी मागणी दानिश रिजवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रात केली आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!