
थेट WhatsApp वर मिळवा
जेवणानंतर खाल्ले जाणारे पान किंवा मुखवास प्रत्येकालाच आवडतो. हॉटेल किंवा लग्नसमारंभासारखा अस्सल शाही मुखवास आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता.
स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : जेवण झाल्यानंतर मुखवास खाण्याची अनेकांची सवय असते. बाजारात मिळणाऱ्या मुखवासामध्ये आरोग्यासाठी उत्तम आणि चवदार घटक असतात. घरच्या घरी कमी साहित्यात तयार होणारा हा शाही मुखवास चवीला उत्तम असून शरीरासाठीही फायदेशीर ठरतो. हा मुखवास ३ ते ४ दिवस सहज टिकून राहतो.
साहित्य आणि कृती
शाही मुखवास तयार करण्यासाठी विड्याची पाने स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावीत. त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करून त्यात धना डाळ, बडीशेप, सुक्या खोबऱ्याचा किस, रंगीत गोड बडीशेप, टूटी-फ्रूटी आणि टरबूजच्या बिया एकत्र कराव्यात. शेवटी यामध्ये आवश्यकतेनुसार गुलकंद मिसळून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा मुखवास नक्की आवडेल.





