
दैनिक स्थैर्य । दि.१२ ऑगस्ट २०२२ । फलटण । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटी द्वारे भारताच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या (अमृत महोत्सव) निमित्त फलटण येथे आझादी गौरव यात्रा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव फलटण तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व शहर अध्यक्ष पंकज पवार यांच्या उपस्थितीत गौरव यात्रा उत्साहात पार पडली.
यात्रेची सुरवात स्वातंत्र्य सेनानी व भारताचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण व स्व.सौ.वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने राष्ट्रपुरुषांच्या पुतळयास अभिवादन करत गजानन चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नियोजित पुतळयाच्या ठिकाणी गांधीजीच्या प्रतिमेला अभिवादन करून यात्रेची सांगता झाली यावेळी फलटण शहरवासियांनी मोठ्या उत्साहात मार्गावर दुतर्फा उभे रहात यात्रेला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी हाँटेल आर्यमान येथे कार्यकर्त्यांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देश स्वातंत्र्या विषयी काँग्रेस पक्षाचे योगदान गांधी, नेहरू घराण्यानी केलेला त्याग सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांची माहिती सांगितली तसेच फलटण शहर व तालुका काँग्रेसला बळकटी देणार असल्याचे सांगितले यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मलठण येथे जाऊन काँग्रेसचे जूनेजाणते ज्येष्ठ असे कादरभाई पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांना भेटुन जून्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी शंकरराव लोखंडे, राजेंद्र खलाटे, अजिंक्य कदम, प्रितम जगदाळे, गंगाराम रणदिवे, अभिजित जगताप, रोहित झांजूर्णे, अल्ताफ पठाण, बालम शेख, बालमुकुंद भट्टड, लक्ष्मण बेंद्रे,सुनील निकूडे, मनोहर गायकवाड, नितीन जाधव, विकास ननावरे, अजय इंगळे संतोष डांगे, अभिलाष शिंदे व शहर व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.