एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन


दैनिक स्थैर्य । दि.१२ ऑगस्ट २०२२ । खटाव। आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधत तिच्या मोठ्या बहिणीने घेतली छोट्या बहिणीची रक्षणाची जबाबदारी बहिणीने घेतली.बंधनाचा हा धागा हाती बांधला. या राखीच्या धाग्याच्या बंधनातून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता बहिणीनेच स्वीकारली आहे.

रक्षाबंधन म्हटले, की बहीण भावाच्या बंधनांचा सण…! बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहीण राखीचा धागा भावाच्या हाती बांधते आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहण्याचे वचन भावाकडून घेते. मात्र बहिणींला भाऊच नसल्याने निराश न होता बहीणच भावाची भूमिका बजावत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील कु.रविना आनंदकुमार यादव,व कु.अमृता आनंदकुमार यादव या दोन बहिणींनी भाऊ नाही.

मात्र भाऊ नसल्याची खंत न ठेवता झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन एकमेकींना राखी बांधून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी आणि वाईट प्रवृत्तीपासून रक्षा करण्याचे जणू वचनच दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75 वर्ष) साजरा होत असताना मुलीही मागे नाही, असाच संदेश देत आपल्या लहान बहिणीच्या रक्षण करण्याची जबाबदारी दुसऱ्या बहिणीने घेतली.

या दोन बहिणींच्या प्रेमाचा आदर्श घ्यावा…

आपल्या छोट्या बहिणीला राखी बांधत तिच्या रक्षणाची जबाबदारी बहिणीने घेतली.

बंधनाचा हा धागा हाती बांधला. या राखीच्या धाग्याच्या बंधनातून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता बहिणीनेच स्वीकारली आहे. समाजात आजही अनेक ठिकाणी नकोशी पाहायला मिळतात. जन्मदातेच लेकीला नकोशी म्हणून तिला दूर करतात. काही निष्ठूर पालक तर रस्त्यावर सोडून निर्दयीपणे निघून जातात. जिवंतपणीच लेकीला मरणाच्या यातना देणाऱ्यांनी या दोन बहिणींच्या प्रेमाचा आदर्श घ्यावा, हाच संदेश या चिमुकल्या बहिणींच्या रक्षाबंधनातून समोर आला आहे.


Don`t copy text!