बुकिंग डॉट कॉम विरुद्ध तक्रार दाखल


दैनिक स्थैर्य । दि. ७ ऑक्टोंबर २०२२ । मुंबई । आगाऊ आरक्षण करुन सुद्धा इंग्लडमधील हॉटेलमध्ये वास्तव्यास परवानगी नाकारली गेल्याबद्दल हे आरक्षण करणा-या बुकिंग डॉट कॉम या कंपनीविरोधात भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

श्री.कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबियांनी 10 मे 2022 रोजी इंग्लडमधील सिटी अल्डगेट अपार्टमेंट्स येथे वास्तव्यासाठी आरक्षण केले होते. बुकिंग डॉट कॉम मार्फत हे आरक्षण करण्यात आले होते. श्री.कुलकर्णी यांचा मुलगा तेथे गेल्यावर मात्र अपार्टमेंट व्यवस्थापनाने 25 वर्षांखालील मुलांना निवासाची परवानगी नाही असे कारण दिले. श्री.कुलकर्णी यांनी आपल्याला व 54 वर्षीय पत्नीला निवासास परवानगी मिळावी अशी विनंती व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र ती विनंती ही नाकारण्यात आली. आगाऊ आरक्षण करुनही संबंधित अपार्टमेंट व्यवस्थापनाने राहण्यास नकार दिल्याने बुकिंग डॉट कॉमने आरक्षणाची रक्कम परत द्यावी अशी मागणी श्री.कुलकर्णी यांनी बुकिंग डॉट कॉमला पाठवलेल्या नोटिसीमध्ये केली आहे. बुकिंग डॉट कॉमने आरक्षण रक्कम व नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये द्यावेत अशी मागणी श्री.कुलकर्णी यांनी या नोटिसीत केली आहे. याबाबतची तक्रार वरळी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!