नागठाणे येथे सोशल डिस्टंसिंगचा नागरिकांनी फज्जा उडवला


स्थैर्य, सातारा, दि. 19 : संपूर्ण जगात  करोना   साथरोगाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सातारा जिल्हा ही रेड झोन झाला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून देशासह संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करून केंद्र आणि राज्य शासन या रोगाला अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे.लॉक डाऊनच्या तिस्रया टप्प्यात शासनाने ब्रयापैकी शिथिलता दिल्याने सातारा जिह्यात अनेक ठिकाणी जीवनावश्यक दुकानांसह अन्य दुकाने सुरू झाली असून बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जात असतानाच नागठाणे (ता.सातारा) येथे बाजारपेठेत मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल डिस्टंसिंगचा नागरिकांनी फज्जा उडवला आहे.येथे बंदोबस्ताला असलेले पोलिसही या गोष्टीकडे कानाडोळा करत आहेत.त्यामुळे कोरोनाचा शिरकाव गावात होतोय की काय? अशी धास्ती येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

लॉकडाऊनच्या तिस्रया टप्प्यात शासनाने रेड झोन मधील कन्टेंटमेंट झोन वगळता इतर ठिकाणी शिथिलता आणली.त्यामुळे सर्वत्र जीवनावश्यक सुविधांच्या दुकानांसह अन्य दुकानही उघडली गेली.नागठाणे हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने येथेही सर्व दुकाने उघडली.मात्र त्यामुळे येथे गावातील ग्राहकांबरोबरच परगावातील ग्राहकांची गर्दी उसळत असल्याने एकप्रकारे “जत्राच” भरली जाते.त्यांच्याकडून सोशल डिस्टंसिंगचे कोणतेच पालन केले जात नसून दुकानांसमोर दिवसभर गर्दी होत आहे.शासनाने दिलेले निर्बंध येथे चक्क पायदळी तुडविले जात असून सध्या येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे

लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्प्यापासून येथील सासपडे चौकात बोरगाव पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.सुरवातीला महिनाभर येथे कडक कारवाई केल्या जात होत्या.मात्र आता चित्र बदलले असून बंदोबस्ताला असलेले पोलीस व त्यांना मदत कारणाने होमगार्ड हे चक्क दिवसभर एका दुकानाच्या सावलीला बसून असतात.गावात एकीकडे नागरिक दुकानांसमोर गर्दी करत असल्याचे पाहूनही त्याकडे कानाडोळा करत बंदोबस्ताच्या केवळ टाईमपास येथे नेमलेल्या कर्मचायांकडून केला जात आहेत.त्यामुळे नेणे बंदोबस्त नेमण्याचा नेमका अर्थ काय? सोशल डिस्टंसिंग न पाळणाया लोकांवर कारवाई का केली जात नाही?. केवळ दिवसाची डय़ुटी कशीबशी भरण्याचे काम या पोलिसांकडून केले जात असून त्यामुळे या आततायी लोकांमुळे व बोरगाव पोलीस ठाण्याच्या ढिसाळ बंदोबस्तामुळे नागठाणे गावात  करोना  चा शिरकाव होईल अशी धास्ती येथील ग्रामस्थांमधे निर्माण झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!