
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । नांदल । नांदल येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय यांच्या वतीने फलटण तालुक्यातील नांदल गावात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थातच बाल दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदल येथे बालदिन उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये विविध खेळ, मुलांचे भाषण तसेच शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला याप्रसंगी शाळेतील शिक्षक व नांदल गावचे सरपंच वृषाली कोळेकर, उपसरपंच ठकाताई कोळेकर, ग्रामसेवक सदाशिव कारंडे, चेअरमन नामदेव कोळेकर, विठ्ठल मदने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत युवराज काळे, धीरज कणसे, विवेक पाठक, गणेश अवताडे, ऋषिकेश चव्हाण, गणेश बोराटे, पृथ्वीराज बाबर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हे कृषिदूत यांनी नांदल येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.