• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 18, 2023
in लेख

कोरडवाहू भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी  “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना”  योजना शासनाने  सुरू केली आहे.

कमी पाऊस पडणाऱ्या भागात पीकांसाठी सिंचनाची सुविधा महत्वाची आहे.  केवळ पावसावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधनांमधून पाणी आणून पिकांना पाणी दिल्यास शाश्वत उत्पन्न घेता येते. विशेषत: ठिबक व तुषार सिंचन शेतकऱ्यांना अधिक  लाभदायी ठरते.

कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी  सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय कृषि विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते.

ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत 55 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत 25 टक्के असे एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच बहूभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के व 30 टक्के असे एकूण 75 टक्के अनुदान देण्यात येते.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान ठिबक व तुषार सिंचनाचे संच बसवण्यासाठी देण्यात येते. तर बहु भूधारक शेतकऱ्यांनाही दोन्ही योजनेतून 45-45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळावरुन 24×7 अर्ज प्रक्रिया सुरु आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून हार्डकॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन सोडत  असल्याने प्रक्रीया संपूर्णपणे पारदर्शी आहे.  योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत लाभ मर्यादा राहील. शेतकऱ्यांच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते. केंद्राच्या सुधारित खर्च मर्यादेप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध होते.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून सूक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://mahadbtmahait.gov.in ला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


Previous Post

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल रमेश बैस

Next Post

आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्या

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश

जून 8, 2023

नानासाहेब थोरात यांची ‘जिनिव्हा’ परिषदे साठी निवड

जून 8, 2023

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

जून 8, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान

जून 8, 2023

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

जून 8, 2023

अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी संधी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जून 8, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

जून 8, 2023
रुग्णांना मार्गदर्शन करताना सुनंदा पवार व इतर

श्री श्री नेत्रालय बारामती येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जून 8, 2023

फलटणमध्ये पालखी सोहळ्याचे बारकाईने नियोजन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी

जून 8, 2023

सुरवडीत साळुंखे – पाटलांच्या घरी मंत्री ना. विखे – पाटील

जून 8, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!