सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जपान बँकेसमवेत चर्चा


दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । दावोस । जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत  महाराष्ट्र दालनात बैठक झाली.

जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे  इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी  उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.


Back to top button
Don`t copy text!