फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘चालक दिन’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण येथे ‘चालक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटणचे वाहन निरीक्षक श्री. खटावकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. अक्षय खोमणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. विशाल थोरात, सीनिअर क्लार्क श्री. दीक्षित, श्री. सागर लाळगे, श्री. किरण लेंभे, श्री. संतोष अहिरे, श्री. सागर जाधव, श्री. समीर जाधव, श्री. धीरज जाधव, श्री. भरत महागंडे, श्री. सुनील नलवडे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे व उपाध्यक्ष श्री. सनी कदम व रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच फलटण शहरातील चालक मालक उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या व फलटण शहरातील चालक वाहकांचा सत्कार श्री. खटावकर यांच्या हस्ते करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्काराला उत्तर देताना रिक्षा संघटनेचे श्री. विजय भोंडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन श्री. दीक्षित यांनी केले, तर आभार श्री. किरण लेंभे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!