ऑक्टोबर २०२२ चे अवकाळी अनुदान प्राप्त करण्यासाठी ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात आणि फलटण तालुयात मोठ्या प्रमाणावर विविध शेतीपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये फलटण तालुक्यातील २५६३ खातेदारांचे गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचेमार्फत संयुत पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर एकूण २२७२ खातेदारांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर अनुदान रकम थेट जमा झालेली आहे. मात्र, अद्याप २९१ खातेदारांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणे अद्याप बाकी आहे. सदर २९१ खातेदारांच्या याद्या त्यांच्या विशिष्ट क्रमांकासह संबंधित गावच्या तलाठ्यांकडे देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

अनुदान प्राप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या गावच्या तलाठ्याकडून आपला विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, त्यामुळे त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. याबाबत काही अडचण आल्यास त्यांनी तहसील कार्यालय, फलटण येथे तहसीलदार अथवा निवासी तहसीलदार अथवा महसूल सहाय्यक श्रीमती माने यांना कार्यालयीन वेळेत समक्ष भेटावे, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!