दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । फलटण । हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे 49 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 27 जुलै रोजी रात्री साडेआठ ते 28 जुलै रोजीच्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान झिरपे गल्ली मंगळवार पेठ फलटण येथे अज्ञात चोरट्याने बंद खोल्यांच्या घराचा कोयंडा कशाने तरी कापून घरात प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले सुमारे 49 हजार रुपये चोरी केले आहेत. याबाबतची फिर्याद बाळू दगडू कुंभार 49, राहणार कुंभार गल्ली, रविवार पेठ, फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वीरकर करीत आहेत.