दैनिक स्थैर्य | दि. 27 जुन 2024 | फलटण | फलटण शहरामध्ये जी अतिक्रमणे आहेत. ती अतिक्रमणे फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील असलेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात येत आहे. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. फलटण शहरातील कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण असेल तरी ते आता तातडीने कडण्यात येणार आहे; अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी मोरे म्हणाले की; श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळाच्या अनुषंगाने शहरातील श्री नामदेव शिंपी समाज ट्रस्ट यांचे धोकादायक असलेले इमारत ही नगर परिषदेच्या वतीने पाडण्यात आली आहे. यावेळी नगरपालिकेचे नगररचना विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच कर विभाग यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.