गिरवीतील गोपाळकृष्णाच्या दिव्यत्वाची कोल्हापूरच्या साधकास प्रचिती


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
दिव्य इतिहास असलेल्या गिरवी (ता. फलटण) येथील प्राचीन व जागृत मंदिरात दर्शन व प्रार्थना करणार्‍या देश विदेशातील साधकांना नेहमीच उत्तम प्रचिती येत असते. कोल्हापूर येथील एक साधक श्री. विवेक वेदपाठक गिरवीच्या गोपालकृष्णाचे भक्त आहेत. तसेच त्यांचे अनेक वर्षे तिरुपती येथे जाणे असल्याने तिरुपती येथील प्रधान आचार्य श्री. अनंत वेंकट दीक्षित गुरुजी यांचा घनिष्ठ संबंध आहे. अलिकडे एप्रिल २०२४ मध्ये तिरुपती येथे गेल्यावर गुरुजी खूपच आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, असे समजताच आणि गुरुजींची प्रकृती खालवली असे दिसले असता, तिरुपती संस्थान यांनी गुरुजींना चेन्नई व हैद्राबाद येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती करूनही सुधारणा झाली नव्हती.

घरातील सदस्यांनी अशी चिंताजनक परिस्थिती असल्यामुळे श्री. वेदपाठक यांना कोल्हापूर महालक्ष्मीस प्रार्थना करण्यास विनंती केली. श्री. वेदपाठक यांना गिरवी मंदिराचा अनुभव व प्रचिती माहिती असल्याने गिरवी मंदिरात अनुष्ठान करणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन गिरवी मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री. जयंतकाका यांना फोन करून त्वरित प्रार्थना व अभिषेक गिरवी मंदिरात करण्याची विनंती केली व तशी प्रार्थना आणि विशेष अभिषेक गिरवी येथे करताच सुमारे ५ ते ६ आठवड्यात विलक्षण सुधारणा होऊन आता गुरुजी हिंडत फिरत असून त्यांनी स्वतः श्री. जयंतकाका यांना फोन करून धन्यवाद दिले आहेत. तसेच दीक्षित गुरुजी यांच्या विनंतीनुसार गोपाळकृष्णाचा फोटोही नित्य दर्शनासाठी पाठवला आहे.


Back to top button
Don`t copy text!