
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्याचे नेते व श्रीराम बझारचे संस्थापक सहकार महर्षी कै. हणमंतराव पवार (आण्णा) यांच्या २३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक १७ जुलै २०२० रोजी सकाळी १०.३० वा. त्यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून कै. हणमंतराव पवार (आण्णा) यांना श्रद्धांजली वाहणेत येणार आहे. तसेच सालाबादप्रमाणे या प्रसंगी संस्थेमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आलेले आहे. तरी फलटण व पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदानासारख्या महान कार्यात आपला सहभाग नोंदवून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करणेचे आवाहन श्रीराम बझारने केले आहे.
